Holi Colour होळीचे रंग काढा घरगुती उपायांनी

मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (19:37 IST)
रंगाशिवाय होळी खेळण्याचा मजा नाही. अनेकदा आर्गेनिक रंग वापरले तरी टोळीतून एखाद्याने बदमाशी करत पक्के रंग वापरले तरी 'बुरा न मानो होली है'. तेव्हा ती मजा नंतर सजा होते. सिंथेटिक रंगांमुळे चेहर्‍यावर रेशेज होऊ शकतात तसेच चेहरा रुक्षही पडतो. केमिकल आढळणारे रंग सोडवण्यासाठी पुन्हा कॉस्मेटिक वापरणे योग्य नाही म्हणून घरगुती फेसपॅक तयार करून रंग सोडवण्याचा प्रयत्न करावा.
 
बेसन
बेसनात, चोकर, दूध आणि लिंबाचा रस मिसळून पॅक तयार करा. हे पॅक लावून हलकं वाळू द्यावं. नंतर ओल्या हाताने पॅक स्क्रब करत सोडवावा. पूर्णपणे पॅक हटवल्यानंतर साबण आणि पाण्याने स्कीन धुवावी.
 
मुलतानी माती
मुलतानी मातीत गुलाब पाणी आणि दही मिसळून पॅक तयार करावे. चेहर्‍यावर लावून ठेवावे. वाळल्यावर चेहरा धुवावा. केसातून रंग सोडवण्यासाठी पाणी मिसळून मुलतानी मातीचा पॅक तयार करावा. केसांमध्ये लावून वाळू द्यावे. वाळल्यावर केस धुऊन टाकावे.
 
डाळींचे पीठ
भिन्न डाळींचे पीठ घेऊन त्यात तांदळाचे पीठ मिसळावे. यात दूध किंवा दही मिसळून लिंबाचे रस घालावे. पॅक चेहर्‍यावर लावून ठेवावे. नंतर ओल्या कपड्याने स्क्रब करावे.
 
काकडी
काकडीच्या रसात गुलाब पाणीचे काही थेंब आणि एक चमचा एप्पल व्हिनेगर मिसळून घ्या. हे मिश्रण स्कीनवर लावावे. काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवावे.
 
गव्हाची कणीक
गव्हाच्या कणेकत हळद, दूध, गुलाब पाणी मिसळून मळून घ्या. यातील गोळा घेऊन स्कीनवर स्क्रब करा. 2-3 वेळा ही प्रक्रिया अमलात आणा नंतर स्कीन धुऊन घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती