केसांचा मसाज करण्याच्या टिप्स

केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.

 

तेलाने मसाज करण्यासाठी लागणे साहीत्य:
साहित्य- खोबरेल तेल किंवा विटँमिन 'इ'युक्त तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी. 

असा करावा केसांचा मसाज...
1) प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.
2) 15 मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्‍या कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.
3) थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.
4) मनेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.
5) अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.
6) 15 मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
7) मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती