Guava leaves benefits :सध्या सर्वांनाच काळेभोर, लांब, सुंदर केस आवडतात. केस सुंदर दिसण्यासाठी विविध फॅन्सी हेअर प्रॉडक्ट वापरतात. केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेतली तर केस लांब आणि सुंदर होतात. या साठी पेरूच्या पानांचा वापर देखील करू शकता. पेरूची पाने आपण निरूपयोगी समजून फेकून देतो. पण पेरूच्या पानांनी केसांच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. पेरूच्या पानांचे फायदे जाऊन घ्या.
डोक्यातील कोंडा उपचार -
थंडीच्या दिवसात कोंड्याची समस्या वाढल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत पेरूच्या पानांचा वापर केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. वास्तविक, यात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे कोंडा आणि टाळूच्या इतर समस्या दूर करण्यात मदत करू शकतात.
केस कंडिशन होतात-
पेरूच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक तेल केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते. म्हणून, कोरड्या आणि कुरळे केसांसाठी त्याच्या पानांचा हेअर मास्क खूप चांगला मानला जातो. यामुळे तुमच्या केसांचे व्यवस्थापन करणे सोपे होते. त्याच वेळी, केस अधिक मऊ आणि रेशमी दिसतात.
केसांची वाढ होते-
केस लवकर वाढलेले पाहायचे असतील तर पेरूच्या पानांचा वापर करावा. वास्तविक, त्यात व्हिटॅमिन बी आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्याच्या रुटीनमध्ये याचा समावेश करता, तर केसांची वाढ जलद होतेच पण केसगळतीची समस्याही बर्याच प्रमाणात कमी होते.