कसलेली आणि स्वच्छ स्कीनसाठी 8 नैसर्गिक उपाय

अनेकदा चेहर्‍याची त्वचा लटकून जाते आणि चमकही नाहीशी होऊन जाते. अनियमित आहार, ऊन, वयाप्रमाणे आणि इतर काही निष्काळजीचा प्रभाव चेहर्‍यावर होत असतो. चेहर्‍याची त्वचा टाईट करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात उत्तम पर्याय ठरतात. येथे आम्ही 8 नैसर्गिक उपाय देत आहोत ज्याने आपल्या चेहर्‍याला पोषण मिळेल.
 
कोरफड
बर्न स्कीनवर कोरफड जादूप्रमाणे प्रभाव सोडतं. 15 मिनिट कोरफड जेल त्वचेवर घासल्याने प्रभाव दिसू लागतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय अमलात आणावा. मध मिसळून याचा प्रभाव वाढवता येईल.
काकडी
30 मिनिटापर्यंत काकडीचा रस चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने डाग, सुरकुत्या आणि सूज कमी होण्यात मदत मिळेल.

दालचिनी
दालचिनी वापरल्याने चेहर्‍याचे तारुण्य कायम राहतं. परंतू नुसती दालचिनी वापरणे योग्य नाही. म्हणून हळद आणि दालचिनी पावडर सममात्रेत मिसळा. याची पेस्ट तयार करण्यासाठी जैतुनचे तेल वापरा. ही पेस्ट लावून वाळल्यावर धुऊन टाका. नंतर साखरेच्या दाण्यांनी 5 मिनिटापर्यंत चेहरा घासा. पुन्हा धुवा. आठवड्यातून दोनदा ही क्रिया अमलात आणा.
खाण्याचा सोडा
खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे लावल्याने चेहर्‍यावरील डाग मिटतात.

मध
मधात लिंबाचा रस आणि जैतुन तेल मिसळून घ्या. हे मिश्रण त्वचेवर घासा. चेहरा धुतल्यावर लगेच याचा प्रभाव दिसून येईल. चेहर्‍यावर नवीन तारुण्य दिसून येतं. हे दिवसातून दोनदा अमलात आणू शकता.

 
लिंबू
प्रभावित जागेवर लिंबाचा रस लावून 20 मिनिटानंतर ती जागा धुऊन टाका. परिणामासाठी हा उपाय निरंतर अमलात आणा.

जैतुन तेल
रात्री झोपण्यापूर्वी जैतुनच्या तेलाने मालीश करा. रात्रभर याचा प्रभाव आपल्या त्वचेवर होत राहील.
अंडी
दोन अंडीचे पांढरे भाग मिश्रण होयपर्यंत फेटून घ्या. याला त्वचेच्या प्रभावित भागेवर लावा. 20 मिनिटानंतर चेहरा धुऊन घ्या.

वेबदुनिया वर वाचा