शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी हे 4 उपाय अवलंबवा

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (20:20 IST)
शरीरावरील जास्त केस असल्यास लाज वाटते. नको असलेले केस काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु ते उपाय खर्चिक असल्यामुळे प्रत्येकाला अवलंबवणे परवडत नाही . अशा परिस्थितीत काही घरघुती उपाय आहेत ज्यांना अवलंबवून आपण शरीरावरील नको असलेले केसांना काढून त्यापासून मुक्ती मिळवू शकता .
हे उपाय नियमितपणे केल्यावर केसांची वाढ देखील कमी होईल. चला तर मग कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊ घ्या.
 
 1 साखर आणि लिंबू - 2 चमचे साखर आणि 8 चमचे लिंबाचा रसाचे थेंब घालून साखर विरघळे पर्यंत मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर हे रस प्रभावित भागेवर लावा आणि 20 ते 25 मिनिटानंतर ओलसरच हळुवार पणे हात वर्तुळाकार फिरवा .असं केल्याने नको असलेले केस निघून जातील .हे आठवड्यातून किमान 3 वेळा करा. 
 
2 मध आणि लिंबू - 2 चमचे साखर आणि 1 चमचा मध मिसळा आणि सुमारे 3 मिनिटे गरम करा. वितळल्यावर  ही पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि सुती कपड्याच्या साहाय्याने केसांना उलट दिशेने काढा. या मुळे आपली त्वचा मॉइश्चराइज देखील होते. 
 
3 दलिया आणि केळी - हा उपाय फारच कमी लोकांना माहित आहे. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे बनविण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे दलिया घेऊन त्यात एक पिकलेली केळी मिसळा आणि पेस्ट बनवा. या पेस्टने सुमारे 15 मिनिटे मसाज करा. दलिया हे हायड्रेटिंग स्क्रबचा उत्तम स्तोत्र आहे. या मध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट मुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासह त्वचा तजेलदार बनते. 
 
4 बटाटे आणि डाळ - 3 बटाटे घेऊन त्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा.  डाळ रात्री भिजत घाला.सकाळी डाळीला वाटून घ्या आणि त्यात इतर सर्व साहित्य मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट 20 मिनिटे प्रभावित भागावर लावून हळुवार हाताने वर्तुळाकार चोळा नंतर पाण्याने धुवून घ्या. या उपायामुळे शरीरावरील नको असलेले केसांची वाढ हळूहळू कमी होईल. आठवड्यातून हे किमान 2 वेळा करा.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती