होळी काहीच दिवसांवर येऊन टिपली आहे. रंगामुळे केसांवर आणि त्वचे वर वाईट प्रभाव पडतो. या केसांना रंगाच्या दुष्प्रभावापासून वाचविण्यासाठी या टिप्स अवलंबवा. जेणे करून केसांना काही त्रास होणार नाही. आपण या पैकी कोणत्याही एका तेलाने आपल्या केसांची मॉलिश करा नंतर होळी खेळा. या मुळे केस सुरक्षित राहतील. चला तर मग जाणून घेऊ या
1 मोहरीचे तेल- हे सर्वात जास्त फायदेशीर आहे या तेलात प्रथिन, सेलेनियम, व्हिटॅमिन बी,ओमेगा-3 फॅटी ऍसिड आढळते. हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. हे तेल केसांना होळीच्या रंगापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. या तेलाने केसाची मॉलिश करून होळी खेळू शकता. नंतर शॅम्पू करून घ्या.
2 नारळाचं तेल- हे देखील केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये आढळणारे असेन्शियल फॅटी ऍसिड,आणि व्हिटॅमिन केसांच्या मुळाच्या जवळ जमलेले सिबम काढून टाकतात आणि केसांची वाढ करतात. स्कॅल्पला पोषण देतात. होळीच्या रंगांपासून वाचविण्यासाठी केसानी मॉलिश या तेलाने करा.