आजच्या धकाधकीच्या चुकीच्या जीवनशैली,खाण्याच्या सवयी, रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. केसांची गळती होणे, अवकाळी केस पिकणे, कोंडा होणे या सारख्या समस्या उदभवतात. प्रत्येक महिलेला सुंदर केसांची आवड असते. केसांची गळती आणि कोंड्यामुळे केसांचे सौंदर्य नाहीसे होते. या वर उपाय आहे बडीशेप. बडीशेपचा वापर करून केसांच्या समस्येला सोडवू शकतो. बडीशेप केसांचा कोंडा कमी करून केस मजबूत करते. कसे काय ते जाणून घेऊ या.
कोंडा दूर करते
बडीशेप मध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. हे डोक्यातील कोंडा निर्माण करणाऱ्या टाळूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि लोह केसांचे आरोग्य आणखी सुधारते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.