रात्रभरात गोरे व्हा

उजळ त्वचेसाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरून वैतागला असाल तर आम्ही आपल्याला येथे सांगत आहोत अगदी सोपा आणि घरगुती उपाय. काही घरगुती फेस मास्क लावून रात्रभरात त्वचा उजळ होऊ शकते. मुख्य म्हणजे हे उपाय अगदी नैसर्गिक आणि स्वस्त आहे.
पिगमेंटेशन आणि सन टॅनिंगमुळे त्वचा सावळी पडू लागते. त्वचेसंबंधी अश्या समस्यांपासून सुटकारा मिळविण्यासाठी हे नैसर्गिक उपाय अमलात आणावे. येथे‍ सांगण्यात येत असलेले मास्क आपण रात्रभर चेहर्‍यावर लावून झोपू शकतात आणि सकाळी उठल्यावर आपल्या चमत्कारिक प्रभाव जाणवेल. परंतू कोणतेही मास्क लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून बघावे. कुठल्याही प्रकाराची रिअॅक्शन होत असल्यास हे वापरणे टाळावे.
 
केळ- गुलाबपाणी
एक केळ मॅश करून त्यात गुलाब पाणी मिसळा. चांगल्यारीत्या मिसळून चेहर्‍यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

दही- काकडी
काकडी आणि दही दोन्ही त्वचा उजळविण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. 2 काकड्या बारीक वाटून घ्या. यात एक चमचा दही टाका. हा मास्क चेहर्‍यावर लावा. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
लिंबू रस- मध
अर्धा चमचा लिंबाच्या रसात मध मिसळा. हे मास्क चेहरा आणि मानेवर लावा. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
हळद- ऑलिव्ह ऑयल
अर्धा चमचा हळदीत एक चमचा ऑलिव्ह ऑयल मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.

मिल्क पावडर- बदाम तेल
अर्धा चमचा मिल्क पावडरमध्ये एक चमचा बदामाचे तेल मिसळा. चेहर्‍यावर लावून रात्र भर असेच राहून द्या.
 
स्ट्रॉबेरी- ग्रीन टी
एक स्ट्रॉबेरी क्रश करून घ्या. ग्रीन टी शिजवून गार करून यात मिसळून घ्या. त्वचेवर लावून रात्रभरा राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
जिरं- टरबूज रस
एक वाटी पाणी भरून त्यात जिरे भिजवून ठेवा. जिरे वाटून त्यात टरबूज रस मिसळा. हे मिसळून चेहर्‍यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.

वेबदुनिया वर वाचा