चेहर्‍यावरील फॅट्स कमी करण्यासाठी

च्युइंग गम चघळा- च्युइंग गम चघळ्याने गालावरील फॅट्स कमी होण्यात मदत मिळते. जेवल्यानंतर काही मिनिटांसाठी च्युइंग गम चावण्याची सवय टाकून घ्या. पण हे क्रिया इतकी अधिक नसावी की याने आपला गळा किंवा जबडा दुखायला लागेल.
एक्स आणि ओ चा अभ्यास- पूर्णपणे किमान 15 वेळा एक्स आणि ओ या शब्दांचा उच्चारण करावे. जरा मिनिट आराम देऊन ही क्रिया तीनदा करावी. हा सोप्या उपायाने आपला जबडा मजबूत होईल आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे जबड्याच्या व्यायामदेखील. या उपाय कधीही आणि केव्हाही करत येऊ शकतो.
 
जबडा उघडा- आपले तोंड गोल आणि विस्तृत करून उघडा आणि काही सेकंदांसाठी अश्याच मुद्रेत राहा. जबड्याला आराम देऊन पुन्हा करा. हा व्यायाम 9 वेळा करावा. वाटल्यास दिवसातून तीन-तीनदा करू शकता. अधिक वेळा केल्यास वेदना जाणवू शकतात.

चीक लिफ्ट करण्यासाठी- आपले गाल आपल्या डोळ्यांकडे उचला. यासाठी तोंडाचे कोपरे वापरा. गाल उचलण्यासाठी डोळे बंददेखील करू शकता. हा व्यायाम आपल्या सोयीप्रमाणे अनेकदा करता येऊ शकतो. पण अती नसावी हे लक्षात असू द्या.
 
फिश लिप्स- गाल आतल्या बाजूला ओढा. दोन्ही ओठ बाहेरून खेचून मासोळीसारखे ओठ करावे. दहा सेकंदांसाठी ही मुद्रा असू द्यावी. हा व्यायाम दहा वेळा करावा.
गाल फुगवा- आपलं तोंड बंद करून गाल आणि तोंडात वारं भरा. नंतर एका गाळातील वारं दुसर्‍या गालात घेऊन जा. किमान दहा वेळा वारं एका गाळातून दुसर्‍या गाळात भरत राहा. हा व्यायाम दिवसातून तीन वेळा करा.

ओठ ओढून गाल फुगवा- हा व्यायाम करण्यासाठी ओठ ओढून गाल आतल्या बाजूला ओढा. जसे काही चोखताना केले जातात. काही सेकंद स्थिर राहा आणि नंतर जितकं शक्य असेल तेवढे गाल फुगवा. फुगलेले गाल स्थिर असू द्या नंतर पुन्हा आतल्या बाजूला ओढा. दहा वेळा हा व्यायाम करा. दिवसातून तीनदा दहा-दहा वेळा हा व्यायाम केला जाऊ शकतो.
 
हसा- हसल्याने चेहर्‍याच्या व्यायाम होते. दहा सेकंद हसण्याच्या मुद्रेत स्थिर राहा. दहा वेळा ही क्रिया करू शकता. तसेच दिवसभर हास्य स्मित ठेवल्याने चेहर्‍यावरील फॅट्स कमी होतील आणि दिवसभर सकारात्मकता राहील.
गालाची मालीश- सर्व व्यायाम झाल्यानंतर आपल्या बोटांनी सर्कुलर मोशनमध्ये हळुवार गाल आणि जबड्याची मालीश करा. याने वेदना आणि ताण कमी होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती