राष्ट्रगीतावेळी च्युईंग गम चघळत होता रसूल!

कानपूर- भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान येथे पहिला टी-20 क्रिकेट सामना झाला असून यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना काश्मिरी ऑफ-स्पिनर परवेझ रसूल हा च्युईंग गम चघळताना दिसला. त्याने राष्ट्रगीताकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप करत सोशल मीडियावर त्यावर टीका केली जात आहे.
 
सोशल मीडियावर लोक त्याच्यावर तुटून पडले आणि सडकून टीका केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वेबदुनिया वर वाचा