Dusky Skin Makeup भारतात सावळा रंग असणे अगदी सामान्य आहे. लोकांना उजळ रंगाप्रती आकर्षण असलं तरी सावळा किंवा गव्हाळ स्किन टोन खूपच आकर्षक असतो आणि मेकअप केल्यानंतर आणखी सुंदर दिसतो, परंतु यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मेकअप टिप्स आणि हॅक्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
वार्म टोन्ड कंसीलर - डस्की त्वचेच्या लोकांनी नेहमी वार्म टोन्ड कंसीलर वापरावे, जे तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा किंचित डार्क असावं. याच्या मदतीने त्वचेवर दिसणारे डाग, जखम आणि मुरुमांच्या खुणा सहज झाकल्या जाऊ शकतात.
डार्क शेड लिपस्टिक- सावळ्या रंगाच्या महिलांनी हलक्या शेडची लिपस्टिक टाळावी, कारण ती त्वचेच्या टोनवर खूप विचित्र दिसते. त्याऐवजी डार्क कलर्स तुमचे सौंदर्य वाढवेल. वाइन आणि ब्राऊन शेड्स खूप सुंदर दिसतात.
योग्य ब्लश- तुमचा रंग जर सावळा असेल तर तुमच्या चेहऱ्यावर ब्लशचं काय काम असा विचार करू नका, उलट त्यामुळे तुमचा लूक वाढेल, पण हो त्वचेपेक्षा पूर्णपणे वेगळा असणारा ब्लश निवडण्याऐवजी तो नैसर्गिक असावा याची काळजी घ्या.