उजळ आणि दागविरहित त्वचा देईल चिकू फेस स्क्रब, या प्रकारे बनवा

गुरूवार, 27 जून 2024 (07:50 IST)
महिला त्वचा उजळ होण्यासाठी ब्यूटी प्रोडक्टस वापरतात. पण जास्त केमिकल युक्त वस्तू वापरल्याने चेहरा खराब होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला घरगुती फेसपॅक सांगणार आहोत, तो आहे चिकू फेसपॅक हा फेसपॅक प्रत्येक ऋतू मध्ये तुम्ही वापरू शकतात. तर चला जाणून घेऊ या याला बनवण्याची पद्धत.
 
चिकूचे फायदे-
चिकू गोड फळ आहे. यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. यामध्ये ग्लूकोज प्रमाण जास्त असते. अँटीऑक्सीडेंट्स आणि खनिजांनी युक्त चिकू त्वचा देखील सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.  
 
चिकू फेस पॅक- 
दूध -  2 चमचे 
चिकू - 3 
मध - 1 चमचा 
 
कसा बनवाल-
फेसपॅक बनवण्यासाठी चिकूला चांगल्याप्रकारे मॅश करून त्यामध्ये मध मिसळा. 
व त्यामध्ये दूध मिक्स करा. सर्व मिश्रण मिक्स करावे.
त्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे.
15-20 मिनट लावून ठेवल्यानंतर पाण्याने धुवून टाकावे.
आठवड्यातून 2-3 वेळेस लावावा.
 
चिकू फेस स्क्रब- 
चिकू - 2 
साखर- 1 चमचा 
मध - 2 चमचे 
 
कसा बनवाल-
एका बाऊलमध्ये चिकू मॅश करून घ्यावा.
मग यामध्ये साखर, मध मिक्स करावे. 
हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यांनंतर मसाज करावा.   
15-20 मिनट लावल्यानंतर धुवून घ्यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती