केस पांढरे होण्यामागी कारणे आणि काळे करण्यासाठी घरगुती उपचार

सोमवार, 18 जानेवारी 2021 (10:28 IST)
केमिकल
शैम्पू, कंडीशनर, कलर, ब्लीच, आणि इतर हेअर प्रॉडक्टसमध्ये केमिकल्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे केस पांढरे होतात.
 
औषधे
डिप्रेशन, मलेरिया किंवा इतर काही एंटीबायोटिक्स औषधे अधिक काळ घेतल्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
 
झोप
किमान सात तास झोप न झाल्यामुळे स्ट्रेस वाढू लागतं.
 
आहार
व्हिटॅमिन बी, आयरन, कॉपर आणि आयोडीन सारखे न्यूट्रीशन आढळणारे पदार्थ आहारात सामील न केल्याने मेलानिन कमी बनतं.
 
हायजीन
केसांची स्वच्छता न ठेवल्याने स्कल्पवर बॅक्टेरिया पैदा होऊ लागतात. ज्याने वाईट परिणाम होतो आणि केस पांढरे होऊ लागतात.
 
ताण
खूप काळ ताण सहन करावा लागत असल्यास शरीरात कॉर्टिसोल स्ट्रेस हॉर्मोन तयार होतं ज्याचा परिणाम केसांवर पडतो.
 
आजार
कमी वयात एग्जिमा, एनीमिया, थायरॉयड किंवा डिप्रेशन सारख्या समस्यांमुळे केस पांढरे होऊ लागतात. म्हणनू वेळेवर आजारावर मात करावी.
 
नैसर्गिकरित्या केस काळे करा
हर्बल मसाज
भृंगराज आणि अश्वगंधा पावडर नारळाच्या तेलात मिसळून रात्री झोपण्याच्या आधी लावा. 10 मिनिट तेलाने मालिश करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
 
शुद्ध तुप
आठवड्यातून तीनदा केसांच्या मुळात शुद्ध तुप लावा. 10 मिनिटाने शैम्पू करा. लवकरच केस काळे होऊ लागतील.
 
अंडी
अंड्यात आढळणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी केसांना काळं आणि चमकदार करतं. केसांना अंडी लावून हलक्या हाताने मसाज करा. 15 मिनिटाने शैम्पू करा. असे आठवड्यातून दोनदा तरी करा.
 
कापूर
ऑलिव्ह ऑयल हलकं गरम करा. यात कापुर मिसळून मसाज करा. 15 मिनिटाने केस धुवुन घ्या.
 
दही
अर्धा वाटी दही घेऊन त्यात एक लहान चमचा मीठ आणि काळीमिरी पावडर मिसळून केसांना लावा. 15 मिनिटाने केस धुवुन घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती