उन्हाळा सुरू झाला की आपण कूल- कूल वस्तूंकडे वळतो. त्यातीलच एक कूल फूड म्हणजे काकडी आरोग्यासाठी तर उत्तम आहेच पण याच्या सेवनाने त्वचा सतेज होते. काकडीत 90 टक्के पाणी आणि दहा टक्क्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पोषक तत्त्व आणि फॅफीक अॅसिडचा समावेश असतो. पाहू काकडीमुळे कसे फुलतं सौंदर्य:
त्वचा कोरडी पडत असेल तर काकडीचा रस लावला. कोरडेपणा दूर होईल.
उन्हाळ्यात चिपचिपमुळे कपडे अंगावर घासले जातात. अश्या ठिकाणी काकडीच्या रसात मध मिसळून लेप तयार करा. हे लेप वेदना होत असलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो.