ऑफिसमध्ये फिट राहण्यासाठी 10 मार्ग

रविवार, 3 फेब्रुवारी 2019 (00:29 IST)
आपण जर आपल्या कार्यालयात दिवसातून 8 ते 9 तास खर्च करता, मग आपल्यास फिट ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ उरतच नसेल. अशामध्ये आपल्या कार्यालयात राहण्याच्या दरम्यान अशा काही गोष्टी नियमितपणे आपल्या नित्यक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये असलात तरीही आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. चला, कार्यालयात काम करताना तंदुरस्तीसाठी 10 मार्ग पाहू या.
 
1. जर तुम्हाला ऑफिसमध्ये सतत बसून काम करायचे असेल तर मध्ये-मध्ये फिरण्याची सवय घाला.
 
2. आपल्या फायली, रजिस्टर इत्यादी स्वत: उचलून ठेवा किंवा दुपारच्या वेळेस आपल्या केबिनमध्ये फिरा.
 
3. कोणत्याही प्रकारे 15-20 मिनिटे नक्कीच चाला, म्हणजे शरीराचा व्यायाम होतो.
 
4. घरीच असा नाश्ता तयार करून ठेवा, जे आरोग्याला पोषक देखील असे आणि तितकंच चवदार देखील. ते पॅक करा आणि कार्यालयात घेऊन जा.
 
5. कणकेचे खारे-गोड मठर्‍या, भाजलेला चिवडा, काळे भाजलेले चणे इत्यादी पदार्थ अधिक प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा.
 
6. आपण ऑफिस मीटिंगसाठी बाहेर जात असाल तर रेस्टॉरंटमध्ये जेवताना सलाड, सूप इत्यादी अधिक घ्या.
 
7. तळलेले-भाजलेले आणि गरिष्ठ अन्ना ऐवजी असे अन्न ऑर्डर करा जे आपल्यासाठी हानिकारक नसतील.
 
8. उन्हाळ्यात थंड पेय घेताना, लक्षात ठेवा की ते जास्त रासायनिक नसावे. आणि हिवाळ्यात गरम पेय प्या, ज्यामुळे गळा खराब होणार नाही.
 
9. काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर मग खुर्चीवरच 10 मिनिट डोळे बंद करून बसा.  
 
10. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या जे व्यायाम करू शकता ते करत राहा. जसे, हात, पाय, खांद्या, मान आणि डोळ्यांचे व्यायाम बसल्या-बसल्या करणे देखील शक्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती