सावळी त्वचा, नो वे!

आपल्या त्वचेवरील सावळी छाया आपल्या सौंदर्याला ग्रहण लावत असते. आपल्या नाजूक व सुंदर चेहर्‍यावरील सावळी छाया दुर करण्‍यासाठी काही टिप्स... 

1. लिंबू त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. याचा प्रयोग वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये करू शकता.
2. दुधाच्या सायीत लिंबाचा रस टाकून तयार झालेली पेस्ट चेहर्‍यावर लावावी. त्यानंतर 10 मि‍निटांनी चेहरा गरम पाण्याने धुऊन घ्यावा.
3. गुडघे व हाताचे कोपरे जर काळपट पडले असतील तर त्यावर लींबाच्या साली घासाव्यात.
4. बिटच्या रसात टोमॅटोचा रस व चिमूटभर हळद मिसळून चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग नाहीसे होतात.
5. द्राक्षाच्या रसात मध टाकून चेहर्‍यावर लावावे.

वेबदुनिया वर वाचा