लिपस्टिक जास्त वेळ टिकत नाही? तर वाचा हे सोपे उपाय

ओठांवर लिपस्टिक लावल्यावर एक वेगळाच लुक दिसतो. पण कित्येकदा अधिक तास बाहेर राहायचे असेल तेव्हा तयार होताना लावलेली लिपस्टिक डल होते आणि अधून-मधून पुसली जाते. हे खूपच वाईट दिसतं. म्हणून आपण पाहू या असे काही सोपे उपाय ज्याने लिपस्टिक टिकून राहील:
आपले ओठ हेल्थी असतील तर लिपस्टिक अधिक काळपर्यंत टिकून राहते. ओठांना निरंतर स्क्रब करत राहावे. यासाठी टूथब्रशही वापरू शकता. ओठांना बाम लावण्यानेदेखील फायदा होतो.
 

लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिल अप्लाय करा. यासाठी आपण न्यूड लिप कलर वापरू शकता, जे प्रत्येक लिप शेडसाठी उपयुक्त ठरेल. लिप पेन्सिल ओठांच्या मध्ये आणि खालील बाजूला लावून पूर्ण ओठांवर मिक्स करा.
 
लिप ब्रश वापरणे योग्य असतं. याने आपल्या इच्छेप्रमाणे लाइट डार्क शेड देण्यासाठी आपल्या हातावर नियंत्रण ठेवता येतं. पण ब्रशमध्ये खूप कलर भरू नका. याने शेड बिघडण्याचा धोका वाढतो. आठवड्यातून एकदा ब्रश नक्की स्वच्छ करावा. 
लिपस्टिकचा पहिला कोट लावल्यानंतर ओठांमध्ये टिशू पेपर दाबा. याने अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल. याव्यतिरिक्त पहिला कोट ब्लॉटिंग पेपरने पुसून घेतला तर लिपस्टिक पसरण्याचा धोका टळेल.

आपल्या ओठांवर बोटांनी ट्रांसलुऐंट पावडर लावा. याने शेड सेट होईल आणि आपली लिपस्टिक पसरणारही नाही आणि हलकीही पडणार नाही. यानंतर पुन्हा एक कोट लावा.
 
लिपस्टिक अधिक वेळापर्यंत टिकावी अशी इच्छा असेल तर तिला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावल्याने ती अधिक काळ टिकते.
शेवटलं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिपस्टिक खरेदी करताना चांगली कंपनी निवडा. यावर ही लिपस्टिक टिकणे अवलंबून असते. आता तर अनेक लिपस्टिक अश्या आल्या आहे ज्या आठ ते दहा तास टिकून राहतात.

वेबदुनिया वर वाचा