१) दोन चमचे ज्वारीच्या पिठात एक चमचा मध, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा दही घालून लेप तयार करावा. यामुळे त्वचेतील रंगकणांचा गडदपणा कमी होतो.
२) दोन चमचे मैदा, अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा आंबेहळद, दोन चमचे दूध, थोडी साय यांचे मिश्रण पॅक स्वरूपात लावल्यास तेलकटपणा कमी होऊन वर्ण उजळतो.
३) दोन चमचे ओटचे पीठ, एक चमचा मध, अर्धा चमचा दही, थोडी हळद एकत्र करून लावल्यास सैल त्वचा आवळली जाते. त्वचेत ताठरपणा येतो.