कुरळे केस हवेत तर वाचा हे सोपे उपाय..

ओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्‍मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कलर्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील.

पिन कर्ल- केसांना चार भागात वाटून घ्या आणि क्वाइलसह ट्विस्ट करत रोल करा. नंतर ड्रायर वापरा. अता क्वाइल खोलून घ्या आणि कर्ली हेअर्स लुक मिळवा. 
 
कर्लिंग आयरन- कर्लिंग आयरनने आपण कोणचाही मदत न घेता केस कर्ल करू शकता. यात केसांना सम भागात वाटून घ्या. नंतर आयरन गरम करून केस कर्ल करा. पण याचा अती वापर केसांची क्वालिटी खराब करू शकते
.
 

हॉट रोलर्स- केस लवकर कर्ली करायचे असतील आणि वेळ कमी असेल तर हॉट रोलर्स वापरा. याने रोल करून बोटाने केस हलके मोकळे करून घ्या.
 
डिफ्यूझर वापरा: जर आपण केसांना हिट वेव्सने केस कर्ल करत असाल तर डिफ्यूझर वापरा. याने आपले केस ड्राय दिसणार नाही.

वेणी: अनेक लोकांना हिट वेव्स किंवा हॉट रोलर्स वापरणे योग्य वाटतं नाही. त्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी रात्री केसांना तेल न लावता अनेक वेण्या बनवा. सकाळी या वेण्या खोलून घ्या. केस कर्ली दिसतील. हा उपाय लॉग हेअर्ससाठी उत्तम आहे.
 
उलटी वेणी: खांद्यापर्यंत केस असणार्‍यासाठी हाही एक सोपा उपाय आहे. रात्री तेल न लावता उंच पोनीटेल बांधा. मग खालील बाजूपासून विपरित दिशेत केस गुंडाळत वरपर्यंत न्या आणि मोठे क्लचर लावून घ्या. सकाळी उठल्यावर नॅचरल कर्ल्स दिसतील.

वेबदुनिया वर वाचा