करा मानेचा सन्मान....

गुरूवार, 23 जून 2016 (00:25 IST)
प्रत्येक स्त्री आपल्या चेहर्‍याच्या सौंदर्यकडे लक्ष देत असते, परंतु बहुतेक स्त्रिया आपल्या मानेच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या स्त्रिया चेहर्‍यावर अनेक प्रकारचे फेसपॅक, क्रीम इ. लावतात पण त्यांच्याकडून  'मान' या महत्त्वाच्या अवयवाची मात्र अपेक्षा होताना दिसते. मानेकडे दुर्लक्ष झाल्याने मानेचा रंग काळा पडत जातो. वाढत्या वयाचा परिणाम मानेवर लवकर होत असतो आणि त्यामुळे तर मानेचे सौंदर्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच या काही सोप्या युक्त्या.... 
* आंघोळ करताना मानेची स्वच्‍छता करण्यास विसरू नये. हलक्या हातानी स्पंजने माळ चोळा. मानेची त्वचा ही नाजुक असते. 
 
* आंघोळीनंतर हलक्या हाताने चेहर्‍याप्रमाणेच मानही पुसावी. नंतर मानेवर चांगल्या प्रतीचे मॉईश्चरायझर लावावे, यामुळे मानेची त्वचा उजळ राहण्यास मदत होते. 
 
* मानेवर वळ्या पडत असतील तर मानेच्या त्वचेला नियमित मालिश करा. मालिश हलक्या हातांनी करा. यामुळे मानेची त्वचा ताणली जाऊन वळ्या नाहीशा होतात व मानेवर असणारी अनावश्यक चरबी ही कमी होण्यास मदत होते. 
 
* चेहर्‍यावर एखादा फेसपॅक लावत असाल तर तो मानेवरही लावा.
 
* मानेवर मळ साठत असेल तर दर 15 दिवसांनी मान जरूर ब्लीच करा.  
 
* उन्हात बाहेर जाताना मान झाकण्याचा प्रयत्न करा. 
 
* चेहर्‍याबरोबर मानेकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते. अनेकदा स्त्रिया मानेवर फाऊंडेशन लावण्याचे टाळतात, ज्यामुळे चेहरा आणि मानेच्या त्वचेच्या रंगातला फरक लक्षात येतो, मेकअप काढताना मान क्लिजिंग मिल्कने स्वच्छ केल्यानंतर मानेवर मॉईश्चरायझर जरूर लावा. 
 
अशा तर्‍हेने मानेचे आरोग्य जपत राहिलात तर तिचे सौंदर्य देखील सहज प्राप्त करता येईल. 

वेबदुनिया वर वाचा