उन्हाळ्यातील कपडे

ऋतूप्रमाणे कपड्यांची निवड करावी. म्हणूनच उन्हाळ्यात आरामदायक कपडे वापरावे.

ND
* उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून या काळात सुती कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.
* गडद किंवा डार्क रंग टाळावेत. उदा- लाल, काळे हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात व शरीरात उष्णता निर्माण करतात. हलके रंग डोळ्यांना शांतता देतात म्हणून - गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा आणि पेस्टल शेड्‍स या रंगांचे कपडे वापरावेत.
* घट्ट फिटिंगच्या कपड्यांचा वापर शक्यतो टाळावा. अन्यथा उष्णता व घामामुळे स्किन अ‍ॅलर्जी होऊ शकते. थोडे सैल फिटिंगचे कपडे या मोसमात आरामदायक असतात.
* लांब बाह्यांचे कपडे घालावे. त्यामुळे तुमचे हात उन्हाच्या संपर्कात येत नाहीत.
* जास्त जड व वर्ख असलेले घालू नये. हलके कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.