हे वर्ष आपल्याला आरोग्यादृष्ट्या मिश्रित फळ देणारं ठरेल. आरोग्यात चढ- उतार होतील. या वर्षी जरी गंभीर आजाराचे लक्षण दिसत नसले तरी आरोग्याची काळजी घेणे कधीही चांगलंच ठरतं. मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ राहाल. एखाद्या जुनाट आजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सुखकारक व समाधानकारक जाणार आहे. हवामानाच्या बदलीमुळे किरकोळ सर्दी, पडसे, तापासार्या आजारांना सामोरा जावं लागणार आहे. वेळेत उपचार केल्यास त्यात आरामही होईल. शाकाहारी आहार आणि नियमित व्यायाम आपल्यासाठी योग्य ठरेल.
मे ते सप्टेंबर या काळात कामाच्या तणावामुळे थकवा येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर प्रभाव दिसू शकतो. काम करताना विश्रांती घेणे विसरू नका. नियमित दिनचर्या ठेवा. मॉर्निग वॉक, व्यायाम नियमित करा.
डिसेंबरपासून वर्ष अखेरपर्यंत आत्मविश्वासात कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे. यासाठी श्री विष्णु सहस्त्रनाम स्रोतांचा पाठ करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.