कर्क राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार राशींच्या षष्ठातील शनीच्या भ्रमणामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली असेल तर ती या वर्षात कमी होणार आहे. कर्क राशीचा चंद्र स्वगृहीचा असला तरी कर्क ही गुरुची उच्च रास आहे. चतुर्थात शुक्र, पंचमात बुध गुरू हे लाभदायक ठरणारे ग्रह गर्ह कर्कराशीच्या उत्कर्षाला कूप कारणीभूत ठरणार आहेत. अष्टमात असलेले मंगळ, नेपच्यून सध्या विरोधात असले तरी ते आपले फारसे नुकसान करू शकणार नाहीत.
कौटुंबिक जीवन
या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य असणार. कुटुंबातील लोकांच्या विचारात सामंजस्य पाहायला मिळेल. सूर्याच्या राहु किंवा केतु अक्षांक्ष वर आल्या मुळे मतभेद होऊ शकतील तसेच मानसिक तणाव देखील वाढतील. याच्या अतिरिक्त तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील, तेही भविष्याच्या दृष्टीने उपयोगी पडणारे असतील. कौटुंबिक जीवनातील कर्तव्याला येत्या वर्षात बरेच प्राधान्य रहील. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि पैसे दोन्ही राखून ठेवणे आवश्यक आहे. फेब्रुवारी ते जून या दरम्यान एखादी चांगली घटना घडल्याने मनाला दिलासा मिळेल.
आरोग्य
इंसोमनिया, रक्त विकार, हार्मोनल असंतुलन, अपचन आणि फूड प्वाइज़निंग सारख्या समस्या उत्पन्न झाल्या मुळे तुम्ही त्रासात असताल. त्वचा संबंधी आजार होण्याची संभावना आहे. आरोग्याच्य बाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कारण या वर्षात प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू राहतील.
करियर
आर्थिक व्यवहार आणि करिअरच्या दृष्टीने 2019 हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. असे असले तरी करिअरचा विचार करता नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाबाबत शुभवार्ता समजण्याची शक्यता आहे. कला, क्रीडा व राजकारणी व्यक्तींची चांगल्या संधी करता निवड होईल. ज्या कामात स्पर्धकांना यश मिळाले नाही, त्याच कामात तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर मुसंडी माराल. नोकरदार व्यक्तींना पूर्वी काही कारणाने निराशा आली असेल तर ती दूर होईल.
व्यवसाय
मार्च महिन्यानंतर तुम्ही नवा व्यवसाय सुरू कराल किंवा तुमच्या व्यवसायाचे विस्तारीकरण कराल. या वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती बळकट राहील. कारण या वर्षभर आर्थिक लाभ मिळविण्याची संधी तुम्हाला मिळत राहील. 2019 च्या राशी भविष्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे हे महिने तुम्हाला सर्वाधिक आर्थिक फायदा मिळवून देणारे महिने ठरण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्पन्नामध्ये झालेली वाढ आणि आर्थिक लाभ यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बळकट होईल आणि समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावेल. आर्थिक लाभांबरोबरच या वर्षी तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंत आर्थिक बाबतीत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक व्यवस्था करा आणि भांडवली गुंतवणूही नीट विचार करून करा.
रोमांस
रोमांस साठी हे वर्ष खूप चांगले असणार. थोडे त्रास होतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. नवीन नाती जुळतील व जुनी नाती आणखीन मजबूत होतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. त्याचा विचार त्यांनी 2019 च्या मध्यापूर्वीच करावा.
उपाय
या वर्षी तुम्हाला समजदारीन काम घ्यायला पाहिजे. योग, ध्यान आणि प्राणायाम करावे. हनुमंताच्या देवळात जावे आणि शनिवारी तसेच मंगळवारी गरीबांना दान द्यावे.