डिसेंबर: जाणून घ्या राशी परिवर्तनामुळे काय असेल आनंदाची बातमी

या महिन्यात अनेक तारे बदल असल्यामुळे जाणून घ्या आपल्या राशीवर याचा प्रभाव:
मेष- मंगल महिन्याच्या पहिल्या दोन भागात आपल्या उच्च राशीत असेल जे आपल्यासाठी शुभ फल देणारे आहे. महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कमाईच्या साधनांमुळे सुधार आणि लाभ मिळण्याचे योग आहे. कौटुंबिक जीवनात सुख शांती आणि देवाणघेवाण बनले राहील. मान- सन्मानात वृद्धी होईल. महत्त्वपूर्ण योजना या दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
वृषभ- भाग्य स्थळी शुक्र असणे आणि आपल्या राशीवर शनीची दृष्टी या गोष्टीचे संकेत आहे की या महिन्यात आपल्याला धावपळ करावी लागू शकते परंतू लाभ आणि सुख प्राप्तीचे निश्चित योग आहे. आपल्याला मेहनतीने आपण उन्नती प्राप्त करू शकता. एखाद्या नवीन योजनेवर कार्य सुरू करू शकता. अपत्याची काळजी वाटू शकते.
 
मिथुन- महिन्याच्या पहिल्या तीन भागात आपली आर्थिक स्थिती अनुकूल असेल. आपल्याला लाभाची संधी मिळू शकते. या महिन्यात यात्रा करावी लागू शकते, म्हणून त्यासाठी तयार राहा. बुध वक्री असल्यामुळे इन्कममध्ये वृद्धी तर होईल पण खर्चही वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
 
कर्क- हा महिना आपल्यासाठी चढ- उतार घेतलेला असेल. कौटुंबिक जीवनात काही चढ- उतार आणि मतभेदाची स्थिती राहील. नोकरी-व्यवसायातही चढ-उतार आणि अनिश्चिततेची स्थिती राहील. या महिन्यात घाई गडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा नाहीतर बनत असलेले कार्यही बिगडतील. तसेच महिन्याच्या सुरुवातीलाच आपले काम बनण्याची शक्यता आहे.

सिंह- या महिन्यात आपली काळजी आणि आरोग्यासंबंधी समस्या वाढण्याची शक्यता आहे. या दिवसात धोका टाळा कारण जखमी होण्याची शक्यता आहे. धन लाभ प्राप्तीची संधी आहे. अनावश्यक पळापळी करावी लागणार. अपत्याची काळजी वाटू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आर्थिक लाभ मिळण्याची संधी मिळेल.
 
कन्या- घरातील मांगलिक कार्यात सामील व्हाल. धर्म-कर्मात रुची वाढेल. आपल्या आत्मविश्वास आणि उत्साहातात वृद्धी होईल. नोकरी-व्यवसायात भाग्यवान ठराल. व्यवसाय लाभ मिळेल, नोकरीत स्थिती चांगली राहील.
 
तूळ- साडेसाती अंतिम चरणात आहे अशात पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळायला सुरू होईल. परंतू आपली समस्या पूर्णपणे संपणार नाही, हळू-हळू स्थिती सामान्य होईल. तसेच आर्थिक दृष्टया या महिन्यात काळजी बनलेली राहील. घेण-देण प्रकरणात काळजी घ्या. जीवनात वाद संभव आहे. अनावश्यक कार्यांमध्ये गुंडाळले राहू शकता.
 
वृश्चिक- हा महिना अनेक गोष्टींमुळे गुंतलेला राहील. महिन्याच्या मध्य भागात मंगल राशीच्या परिवर्तनानंतर आपण जखमी होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. या महिन्यात आपल्याला खूप धावपळ करावी लागू शकते परंतू कमाई होत राहील. आर्थिक दृष्टया अधिक त्रास सहन करावा लागणार नाही.

धनू- आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण आरोग्यात चढ- उतार राहील. आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कारणांमुळे आपल्या मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक कार्य पूर्ण होण्यात अडथळे निर्मित होऊ शकतात. अपत्यामुळे काळजी राहील.
 
मकर- या महिन्यात आपण यात्रेवर जाऊ शकता जी आपल्यासाठी फायदेशीर ठरण्याची उमेद आहे. आरोग्याबाबद थोडं त्रास सहन करावा लागू शकतो. भावंडाची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. जी लोकं वाहन किंवा भौतिक सुख साधन खरेदी करू पाहत आहे त्यांची इच्छा प्रबल होईल ज्यामुळे खर्च वाढेल. मनोरंजनाप्रती ओढ वाढेल.
 
कुंभ- गुरूच्या शुभ दृष्टीमुळे या महिन्यात मान- सन्मान मिळेल आणि धर्म-कर्मात रुची राहील. आपले खर्च वाढतील परंतू शुभ कार्यांवर व्यय झाल्यामुळे कष्ट होणार नाही.  तसीच आपल्याला जखम होण्याची शक्यता असल्यामुळे काळजीपूर्वक कार्य करा.
 
मीन- आपल्या राशीवर गुरुची दृष्टी असल्यामुळे वर्षाचा हा शेवटला महिना आपल्यासाठी शुभ असेल.आर्थिक दृष्टया अचानक धन प्राप्ती झाल्याने खुशी मिळेल. धार्मिक कार्यांत रुची वाढेल. नोकरीत उन्नती होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल आणि एखादे नवीन कार्य सुरू करू शकता.

वेबदुनिया वर वाचा