'ट्रिपल इलेव्हन'मध्ये लव्ह मॅरेज टाळावे!

ND
ट्रिपल इलेव्हन म्हणजे 11.11.11 (11 नोव्हेंबर 2011)ला स्मरणीय बनवण्यासाठी लव्ह मॅरेजवर जोर देण्यात येत आहे. या दिवशी राजधानीत किमान 70 जोडपे परिणय सूत्रात बंधू शकतात. यासाठी आर्य समाजासमवेत लग्न लावणाऱ्या इतर संगठनेत नामांकन होणे सुरू झाले आहे. पंडितांच्या (गुरुजी)अनुसार या दिवशी लग्नाचा मुहूर्त नाही आहे, पण लव्ह मॅरेज(प्रेम विवाह)साठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते.

ट्रिपल इलेव्हन 100 वर्षांनंतर येत आहे, म्हणून याला स्मरणीय बनवण्यासाठी लोक वेग वेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात लागले आहेत. कोणी या दिवशी घराची खरेदी करणार आहे तर कोणी नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहे तर कोणी लग्न करून या दिवसाला स्मरणीय बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

ज्योतिषानुसार या दिवशी लग्नासाठी कुठला ही मुहूर्त उत्तम नाही आहे. पण जे लोक मुहूर्तावर विश्वास ठेवत नाही ते लोक या दिवशी नक्कीच लग्न करू शकतात. गंधर्व विवाहासाठी कुठल्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. कृष्णाने देखील गंधर्व विवाह केला होता.

म्हणूनच या दिवशी होणारे विवाह सफल होतील की नाही याबद्दल काहीच सांगणे योग्य नाही आहे. हिंदू मतानुसार या दिवशी कुठलाही विवाह मुहूर्त नाही आहे. तुलसी विवाहानंतर जेवढेही लग्नाचे योग आहे ते सर्व 11 तारीख सोडून आले आहे.

या दिवशी लग्न करणाऱ्यांनी आधी ह्या गोष्टीचा विचार करून घ्यावा की त्यांना आपले मॅरिड लाईफ रंजक बनवायचे आहे की लग्नाच्या तारखेला स्मरणीय?

वेबदुनिया वर वाचा