येत्या शुक्रवारी (25 नोव्हेंबर) कार्तिकी आमावस्येच्या दिवशी खंडग्रास ग्रहण होणार आहे. ग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सूर्यग्रहणाची वेळ स. 9.52 ते दु. 1.47 पर्यंत आहे, असेही ते म्हणाले.
या अगोदर 1 जून आणि त्यानंतर 1 जुलैला खंडग्रास सूर्यग्रहण आले होते पण तेही भारतात दिसले नव्हते आणि आता 25 नोव्हेंबरला पडणारे खंडग्रास सूर्यग्रहण देखील येथे दिसणार नाही आहे. याच प्रकारे 16 जूनरोजी जे चंद्रग्रहण आले होते ते आता सहा महिन्यानंतर म्हणजे 10 डिसेंबर रोजी येणार आहे.