येणाऱ्या वर्षाचा पहिला दिवस अंकांचे नवीन योग घेऊन येत आहे. वर्षाची पहिली तारीख एका वेळेस चार 'एक' घेऊन येत आहे. याला आपण एक आणि एक अकराच्या रूपात पाहू शकतो. हेच नव्हे तर या वर्षी अंकांचे अजूनही काही नवीन संयोग बनणार आहे.
'एक जानेवारी दोन हजार अकरा'ला जर अंकात लिहू तर एकाच वेळेस चार 'एक' दिसून पडतील. सरळ लिपीत लिहिले तर हे आपण 1-1-11 या प्रकारे लिहू.
योग या प्रकारे येतील : वर्ष 2011 मध्ये 1-1-11ची स्थितीच्या व्यतिरिक्त काही तारखा ह्या प्रकारे येतील ज्याने अंकांचे नवीन योग बनतील. ह्या प्रकारचे योग कमीत कमी नऊ वर्षात एकदा बनतात. या तिथीत 9-10-11 (9 ऑक्टोबर 2011) आणि 11-11-11 (11 नोव्हेंबर 2011) सामील आहे.
या आधीपण असे योग आले आहेत
01-02-03 (1 फेब्रुवारी 2003)
02-03-04 (2 मार्च 2004)
03-04-05 (3 एप्रिल 2005)
04-05-06 (4 मे 2006)
05-06-07 (5 जून 2007)
06-07-08 (6 जुलै 2008)
07-08-09 (7 ऑगस्ट 2009)
08-09-10 (8 सप्टेंबर 2010)
10-10-10 (10 ऑक्टोबर 2010)
एक योग असाही : 12:34:56 7-8-9 (दुपारी 12 वाजून 34 मिनिट 56 सेकंद, 7 ऑगस्ट 2009) ज्यात 1 ते 9 पर्यंत सर्व अंक सामील होते.