नववर्ष 2010च्या प्रारंभीच चंद्रग्रहण आहे. 'थर्टि फर्स्ट'च्या रात्री पौष शुक्ल पक्ष पौर्णिमामध्ये आर्द्रा नक्षत्र व मिथुन राशीमध्ये चंद्रग्रहण होईल. ज्योतिष व वास्तुशास्त्रज्ज्ञ दीपक शर्मा यांच्यामते चंद्रग्रहण 31 डिसेंबरला रात्री 12 वाजून 22 मिनिटानी होईल व रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी ते समाप्त होईल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 2 मिनिटाचा राहील.
चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे एक खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सूतक काळ 31 डिसेंबरला दुपारी 3.22 वाजता प्रारंभ होईल. मिथुन राशी व आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी ग्रहणकाळात विशेष सावधगिरी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी हे ग्रहण अशुभ आहे.
मेष, कर्क, सिंह, कन्या, तूळ या राशीवाल्यांना हे ग्रहण फलदायी आहे तर वृषभ, वृश्चिक, मकर व कुंभ राशीवाल्यांसाठी हे ग्रहण मिश्रित फळ देणारे आहे.
काय करावे:- - ग्रहणापूर्वी स्नान आटोपून पूजनाशी संबंधित वस्त्र धारणकरून मंत्र जाप करावा. - गर्भवती महिलांनी आपल्या पोटाव गाईचे शेन व गेरू लावून घ्यावा. - ग्रहणानंतर यथाशक्तीप्रमाणे दान करावे. - ग्रहणकाळात परमेश्वराचे नाम:स्मरण करावे.
काय करू नये:- - ग्रहण काळात घराच्या बाहेर पडू नये. - प्रवास, खाणे- पिणे वर्जित करावे. - शुभकार्य कार्य करू नये. - गर्भवती महिलांनी कापणे, शिलणे अशी कामे करू नये. - मूर्ती स्पर्श व पूजा वर्जित करावी. - अग्नि संबंधित वस्तुपासून लांब रहावे.