मराठा आरक्षण: मराठा आरक्षणासाठी नांदेड मध्ये तरुणाची आत्महत्या

सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (15:04 IST)
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरावर आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली मराठा समाज एकत्रित होऊन मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी चा दिलेला वेळ संपत आला आहे. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी करत तरुण आत्महत्या करत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना कोणतेही टोकाचे पाऊल न घेण्याचे आवाहन केले आहे.
 
नांदेड मध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे त्यात त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असे लिहिले आहे. 
ओंकार आनंदराव बावणे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने रविवारी संध्याकाळच्या सुमारास गावाशेजारील जंगली पीर जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. माझे आईवडील मोलमजुरी करून आम्हाला शिकवत होते. त्यांची परिस्थती मी पाहू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे. 
 
या पूर्वी रविवारी नांदेडच्या एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. शुभम सदाशिव पवार असे या तरुणाचं नाव होत. त्याने देखील सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याचे लिहिले आहे.











 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती