...तर आरक्षणावरून महाराष्ट्राचे तुकडे होतील- उदयनराजे भोसले

बुधवार, 2 डिसेंबर 2020 (14:48 IST)
"मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. मेहरबानी करून मराठा मुद्द्याला फाटे फोडू नका, नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे नक्की होतील," असं भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
 
उदयनराजे भोसले आणि शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं.  
 
"मुद्दा मी उपस्थित केला असता तर माझ्यावर भडिमार केला असता. मी आणि संभाजी राजे बघतील असे बोलून बंदूक आमच्या खांद्यावर दिली. मराठा आरक्षण दिरंगाईला सर्व आमदार आणि खासदार जबाबदार आहेत," असंही उदयनराजे यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती