आरक्षणाचा निर्णय घाईघाईने नको

बुधवार, 25 जुलै 2018 (14:52 IST)
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट असून त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. आरक्षणाचा निर्णय घाईघाईने करता येणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
 
आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे स‍मितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिले, पण ते कोर्टात टिकले नाही, असेही ते म्हणाले.
 
मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय हेतूने सुरु नाही, मराठा समाजामध्येही गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवे, असे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप
आषाढी वारीत साप सोडण्याचा काहीजणांचा कट होता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने आंदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. सापाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांची आहे, मला त्याची माहिती नाही, असे म्हणत देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला आपले समर्थन नसल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती