राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.या मुद्द्यावरून सध्या मराठा आणि ओबीसीं समाजाच्या नेत्यांमध्ये मतभेद आहे. सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झाली. तासभरबंद खोलीच्या आत चालणाऱ्या या बैठकीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. बंद खोलीच्या आत दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.