मराठ मोर्चासाठी आलेल्या बांधवांच्या हातातील भगवे ध्वज, डोक्यावर परिधान केलेल्या भगव्या टोप्या आणि टी शर्ट घातलेल्या मोर्चेकऱ्यांमुळे आझाद मैदान परिसरात एकच भगवे तुफान आल्याचे चित्र दिसले आहे. जय भवानी, जय शिवराय आणि एक मराठा, लाख मराठा च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि मोर्चाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाले. सभापती रामराजे नाईकनिंबाळकर यांनी कामकाज सुर करताच विरोधकांनी जय जिजाउ, जय शिवराज अशी घोषणाबाजी करत मराठ्यांना आरक्ष मिळालेच पाहिजे अशी मागणी केली. त्यामुळे कामकाज तहकूब केले आहे.जिजामाता उद्यानाजवळील मराठा क्रांती मोर्चाचं शिवसेनेचं पोस्टर मोर्चेकऱ्यांनी फाडल आहे, मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आले आहे. कोणताही तणाव यावेळी नव्हता.'आधी आरक्षण द्या, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हा', अशी मागणी करत आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आशिष शेलार यांना मैदानात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाजपाचा कोणताही पदाधिकारी आणि मंत्री फिरकला नाही. राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे.