मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मनोज जरांगे आज पासून पिणार पाणी

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (12:39 IST)
काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी आंदोलकांनी तीन आमदारांची घरे आणि कार्यालये पेटवून दिली. नगर परिषदेच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. बीडमध्येही प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. बीडमध्ये काही ठिकाणी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आग लावली. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरेही जाळण्यात आली. 
 
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात तीव्र आंदोलन होत आहे. आरक्षणाच्या मागणीला आता वेगळे वळण लागले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण आंदोलन केले आहे. त्यांनी अन्न पाणी सोडले आहे. सोमवारी त्यांनी मराठा बांधवांनी केलेल्या विनंतीमुळे पाणी प्यायले होते. आता पुन्हा त्यांना पाणी पिण्याची विनंती केली असून आज पासून ते पाणी पिणार आहे.  मनोज जरांगे यांनी या घटनांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. हिंसेत सत्ताधारी कुणाचा हात आहे का, अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली. कुणीही हिंसा करू नये, अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगेंनी सांगितलं.

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊ नका, जाळपोळ बंद करा अन्यथा मला नाईलाज काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगे पाटीलांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळल्याने आंदोलनकारी आक्रमक झाले आणि त्यांनी निर्दशने केली. या मुळे मनोज जरांगे पाटीलांनी आज पासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती