सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा संचार बंदी लागू

रविवार, 4 जुलै 2021 (10:44 IST)
सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चेसाठी मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करून देखील आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने जमत आहे.आज सकाळी 11 वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार.पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही.तरीही आंदोलकांचे म्हणणे आहे की आमच्या विरोधात गुन्हे झाले तरी हे आंदोलन होणार.या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आमच्या बांधवाना प्रवेश द्या अन्यथा उद्रेक करण्यात येईल.असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.या मुळे संपूर्ण सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
मराठा आक्रोश मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहे.सोलापूर -बार्शी मार्गावर पोलिसांचे दल तैनात करण्यात आले आहे.जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली आहे.पोलीस प्रत्येक येणाऱ्या गाड्यांची तपासणी घेत आहे. 
 
आंदोलनकर्ते म्हणाले की कितीही मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला तरी ही उद्रेक होणार.आज संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाचे बांधव या आदोंलनात सहभागी होण्यासाठी येणार आहे.त्यामुळे एसटी बसची तपासणी देखील सुरु आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती