मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, सतत कार्यरत असलेले मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे सोबत असणारे अमोल खुणे यांचे सहकारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला चार अज्ञात हल्लेखोरांनी केला असून, अमोल खुणे यांना काही कळायच्या आतच हा जीवघेणा हल्ला त्यांच्यावर करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार गेवराईवरून धानोरा या आपल्या गावी अमोल खुणे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळेस रस्त्यामध्ये चार जण लपून बसले होते. अमोल खुणे हे येतांना दिसताच या चार जणांनी त्यांच्यावर दगड फेकण्यास सुरवात केली. व अमोल खुणे यांच्या डोक्याला एक दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेमध्ये गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारणासाठी नेले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खुणे यांना बलात्कार प्रकरणातील आरोपीवर हल्ला केला म्हणून दोन वर्ष तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच अमोल खुणे हे तुरुंगातून बाहेर आले, व त्यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना साथ देऊन त्यांच्या बरोबर काम करू लागले.