मराठा समाजाला आरक्षण मिळावं या साठी लढणारे नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे, पिंपरी, चिंचवड दौऱ्यावर आहे. ते या दौऱ्या दरम्यान मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहे. मी कोणताही उमेदवार दिला नाही किंवा कोणालाही पाठिंबा दिला नाही. मी राजकीय मार्गापासून दूर आहे. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या नावावर धोका दिला असून त्याची खदखद मराठा समाजाच्या मनात आहे. येत्या लोकसभाच्या निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल. समाजाला ज्याला पाडायचं आहे त्याला समाज पाडेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की , मला या सरकारने खूप त्रास दिला आहे. माझ्यावर खोटे आरोप लावून माझ्यावर उपमुख्यमंत्री यांनी खोटे गुन्हा दाखल केले आहे. आम्हाला फसवले. राज्य सरकारने आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण दिलं नाही तर याचा परिणाम राज्य सरकारला येत्या निवडणुकीत भोगावा लागणार आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याचा इशारा दिला आहे.