नांदेडला मराठा क्रांतीचा महामोर्चा लाखो सहभागी

सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (10:20 IST)
नगर येथील घडलेली घटना कोपर्डीचा निषेद आणि आरोपींना फाशी, अॅट्रासिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी नांदेडमध्ये रविवारी महामोर्चा निघाला आहे. यामध्ये नांदेड शहर सोबतच ग्रामीण भागातून अनेक नागरिक सहभागी झाले होते.
 
दुसरीकडे मा महिला आणि तरुणी, त्यातही विद्यार्थिनींचा सहभाग अतिशय लक्षणीय होता. लाखो नागरिक सहभागी असूनही कुठेही गोंधळ, गडबड, आवाज झाला नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, शांततेत सर्वजण सहभागी झाले होते. यामध्ये विविध मागण्यांचे फलक, भगवा ध्वज, डोक्यावर पांढरी टोपी, दंडाला काळी फीत अशा विविध बाबींनी मोर्चा लक्षवेधी ठरला. नांदेडच्या इतिहासात आजचा मोर्चा रेकॉर्डब्रेक  ठरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे ही या मराठा मोर्चात सहभागी झालेत, नेता म्हणून नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून या मोर्चात सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ग्रामीण भागातून  सकाळी पासूनच लोक सहभागी होत होते. शहराच्या चारही बाजूंनी रांगा होत्या. यावेळी किनटव, माहूरमधूनही विविध वाहनांतून समाज बांधव आले होते. 
शहराच्या नवीन मोंढा मैदानातून सकाळी साडेदहा वाजता निघालेल्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आहे. यावेळी मोर्चा प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना दिले.
 

वेबदुनिया वर वाचा