स्टार प्रचारकांचे संरक्षणासाठी निवडणूक आयोगाने राज्यांना या सूचना दिल्या

सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:46 IST)
यूपीमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या काही दिवसांनंतर निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना स्टार प्रचारकांसाठी पुरेशी सुरक्षा पुरवण्यासाठी निर्देश दिले आहेत.
 
निवडणूक आयोगाने भर दिलेे आहे की स्टार प्रचारक हे निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी त्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
 
आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या स्टार प्रचारकांना निवडणुकीदरम्यान राज्यात पुरेशी सुरक्षा पुरवली जाईल, असे आयोगाने म्हटले.

निवडणूक आयोगाच्या पत्राप्रमाणे संबंधित राजकीय पक्ष त्यांच्या स्टार प्रचारकांना आवश्यक सुरक्षा कवच देण्यासाठी आवश्यक असलेली प्रवास योजना, मार्ग चार्ट आणि इतर कोणतीही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांना प्रदान करतील. स्टार प्रचारकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे निरीक्षण राज्य स्तरावरील नोडल अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील नोडल अधिकारी करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती