Increase in the price of vegetables :भाज्यांचे दर कडाडले

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (10:50 IST)
लहरी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले कोरोनामुळे महागाईत दिवसेंदिवस होणारी वाढ सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावणारी आहे कोरोनामुळे लोकांचे हाल-हाल झाले आहे.अनेकांनी आपल्या नोकऱ्या या काळात गमावलेल्या आहे.इंधन दरवाढ आणि आता पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. लहरी पावसाचा उत्पादनांवर परिणाम होत आहे त्यामुळे आता भाज्यांचेही भाव कडाडले आहे.सामान्य माणसांनी आता कमवावे काय आणि खावे काय अशा प्रश्न उदभवत आहे.
 
भाज्यांना घाऊक बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकरी भाज्यांना रस्त्यावर फेकून देतात.लहरी पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे भाज्यांची लागवड कमी होत आहे.त्यामुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. आणि भाज्यांचे दर कडाडले आहे.सध्या सर्व भाजीपाला 30 ते 65 रुपयांपर्यंत मिळत आहे.भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाचा खिश्याला कात्री लागून महिलांचे बजेट बिघडत आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती