मकर संक्रांती ला सूर्य धनु राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो. यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष योग जुळून येत आहे. या वर्षी संक्रांतीला पाच ग्रह एकत्र येत आहे.या मुळे या सणाचे महत्त्व वाढणार आहे. या दिवशी दान केल्यानं कित्येक पटीने चांगले फळ मिळणार.मान्यतेनुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं जीवनात सौख्य-आनंद आणि समृद्धी मिळते आणि आयुष्य निरोगी राहते.
2 पवित्र नदीत स्नान करा -
या दिवशी गंगा नदीत किंवा इतर कोणत्याही नदीत स्नान करणे शुभ मानतात. या दिवशी आंघोळ करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. काहीही न खाता गंगेत स्नान केल्यावर दान करावे यामुळे आपल्याला दुपटीने फळ मिळेल.
3 या गोष्टींचा वापर करणे टाळा -
या दिवशी खिचडी दान करण्याची प्रथा आहे. म्हणून म्हणतात की लसूण, कांदा,मांसाहार आणि अंडी खाणे टाळावे. या दिवशी मद्यपान देखील करू नये. या दिवशी नशा करणे टाळावे. मद्य, सिगारेट, गुटका इत्यादी वापरू नये.