तिळाचे मोदक

साहित्य : 1 वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, 1/2 वाटी पिठी साखर, पाव वाटी ‍खोबर्‍याचा कीस, वेलची पूड, मैदा, तूप, मोहनसाठी तूप किंवा तेल. 
 
कृती : सर्वप्रथम मैद्यात मोहन घालून भिजवून घ्यावे. नंतर तिळाच्या कुटात वेलची पूड व पिठी साखर घालून सारण तयार करावे. भिजलेल्या मैद्याच्या लहान लहान पुर्‍या करून त्यात हे सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. नंतर तूपात तळून घ्यावे. 

वेबदुनिया वर वाचा