वडिलांना या त्रासात बघून यमराज (हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्या चे पुत्र होय). यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर(कुंभ- ही शनीची रास आहे) जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला.
यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांचा घरी गेले. कुंभ ला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्वे काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर 'मकर' दिले.