'गज'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. 
 
वर्ष 2017मध्ये संक्रातीचे वाहन आहे हत्ती. मकरसंक्रांती तिथी द्वितीया, वार शनिवार, नक्षत्र आश्लेषा, योग प्रीती, करण गर आहे. वाहन गज (हत्ती), उपवाहन आहे गाढव, वस्त्र तांबडे, आयुध धनुष्य, रत्न गोमेद, जाती राक्षस आहे असून शनिवारी येत आहे.  
 
सूर्य 14 जानेवारी 2017च्या सकाळी 7.38 वाजता सूर्य मकर राशित प्रवेश करणार आहे. नक्षत्र असेल आश्लेषा, योग प्रती व गरज करण असेल. तिथि द्वितीया आहे.
 
संक्रातीचा पुण्यकाळ : दि. 14 रोजी सकाळी 7.38 ते दुपारी 3.38 आहे. 
 
संक्रातीचे फळ : संक्रातीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख होईल. 
 
पर्वकालात द्यावयाचे दान : नवे भांडे, गाईला घास, अन्न, भरलेले भांडे, लोकरीचे कपडे, तूप, सोने, कपडे, फळे, तिळाचे लाडू. बांगड्या, आरसा, नारळ व हळदी कुंकू व उपयुक्त असणार्‍या वस्तू इत्यादी.  
 
संक्रांतीमध्ये वर्ज्य कर्मे : संक्रांती पुण्यकालामध्ये कठोर बोलणे, भांडणे टाळावीत. 

वेबदुनिया वर वाचा