दरवर्षी मकर संक्रांतीला या मंदिरात घडतात आश्चर्यकारक चमत्कार, जाणून व्हाल थक्क

मंगळवार, 11 जानेवारी 2022 (09:55 IST)
भारतात अनेक रहस्यमय आणि चमत्कारी मंदिरे आहेत. काही मंदिरांशी निगडित अशी रहस्ये आहेत, जी अजूनही उलगडलेली नाहीत. असेच एक प्राचीन शिवमंदिर कर्नाटक राज्यातही आहे. येथील राजधानी बंगलोरमधील गवी गंगाधरेश्वर मंदिर आहे, ज्यामध्ये दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी अशी घटना घडते जी आश्चर्याने भरून जाण्यासाठी भाग पाडते. ही घटना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येथे पोहोचतात.
 
आश्चर्यकारक चमत्कार घडतो
हे मंदिर कॅम्पे गौडा यांनी 9व्या शतकात बांधले आणि नंतर 16व्या शतकात जिर्णोध्दार केले गेलेले आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे सध्या असलेले शिवलिंग स्वयंनिर्मित आहे, म्हणजेच ते कोणीही बांधलेले नाही. असे मानले जाते की हे शिवलिंग स्वतः प्रकट झाले आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी या मंदिरात एक विलक्षण कार्यक्रम पाहायला मिळतो. या दिवशी सूर्यदेव आपल्या किरणांनी या शिवलिंगाला अभिषेक करतात. तर या शिवलिंगावर वर्षभर सूर्यकिरणे पोहोचत नाहीत.
 
वर्षभरात केवळ मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव उत्तरायण असते तेव्हा केवळ 5 ते 8 मिनिटांसाठीच सूर्याची किरणे गर्भगृहात पोहोचतात आणि शिवलिंगाचा अभिषेक करतात. हे दृश्य सहसा सूर्यास्ताच्या वेळी दिसते. हे दृश्य इतकं विलोभनीय आणि सुंदर असतं की ते पाहण्यासाठी लोक लांबून येतात.
 
मंदिराची वास्तु विशेष आहे
या मंदिराची स्थापत्य कला विशेष आहे. हे मंदिर दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच आग्नेय कोपर्‍यात आहे. तसेच वर्षातून एकदाच सूर्याची किरणे शिवलिंगापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने बनवण्यात आली आहेत. यावरून असे दिसून येते की या मंदिराचा नकाशा तयार करणारे वास्तुविशारद खगोलशास्त्रात जाणकार होते.
 
तुपापासून बनवलेले लोणी
या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या शिवलिंगावर तूप अर्पण केल्यावर ते लोणी बनते, तर सामान्यतः तूप नेहमी लोणीपासून बनवले जाते. तुपापासून लोणी कधीच बनत नाही.
ALSO READ: Makar Sankranti 2020: या प्रकारे दान आपल्यासाठी ठरेल शुभ

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती