व्रत उपाससाठी तयार करा साबूदाणा पापड, रेसिपी लिहून घ्या

शुक्रवार, 8 मार्च 2024 (06:30 IST)
तुम्ही देखील पापड बनवण्याचा विचार करत आहात का? तर साबूदाणा पापड एक चांगला पर्याय आहे. साबूदाणा पापड बनवणे अगदीच सोपे आहे. तसेच तुम्ही यांना बनवून अधिक काळापर्यंत देखील साठवून ठेऊ शकतात. हे साबूदाना पापड तुम्ही उपासच्या दिवशी किंवा मन असल्यास किंवा छोटीशी भूक लागल्यास तेव्हा देखील तळून खाऊ शकतात. चला तर नोट करून घ्या साबूदाणा पापड रेसिपी 
 
साहित्य- 
साबूदाणा- 1 कप 
जीरे 
सेंधव मीठ- चवीनुसार 
 
कृती- 
साबूदाणा पापड हे बनवणे खूप सोप्पे असते. साबूदाणा पापड बनवण्यापूर्वी साबूदाणा चांगला धुवून घ्यावा. मग एका मोठया पातेलीत साबूदाणा टाकून त्यात तिनपट पाणी घालावे. मग 2-3 तासांनी तो फुलल्यानंतर मग परत एका मोठया पातेलीत पाणी घालून ते उकळवायला ठेवावे. पाणी उकळल्यानंतर त्यात भिजवलेला साबूदाणा टाकावा . मग यात नंतर मीठ आणि जीरे घालावे. व नंतर सतत हे मिश्रण हलवावे तरच ते छान शिजेल. सतत हलवले नाही तर चिटकुन जाईल हे मिश्रण पांढरे दिसायला लागले की गॅस बंद करावा. आता एक मोठी पॉलीथीन घेऊन त्यावर एका पळीच्या मदतीने गोल गोल पापड टाकावे. पापड बनवल्यानंतर 2-3 दिवस उन्हात ठेवावे. मग हे चांगले वाळल्यानंतर तुपात किंवा तेलात तळून याची चव घेऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती