केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दोन्हीही निवडणूका एकत्र होतील असे म्हटले होते पण तसे झाले नाही.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाली आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे.