राष्ट्रवादीने दिली अधिकृत उमेदवारी मात्र उमेदवारी सोडून उमेदवार भाजपच्या वाटेवर

सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:14 IST)
सध्या निवडणुका म्हटले की अनके इच्छुक उमेदवारांना तिकीट पाहिजे असते. सोबत पक्ष सोडून दिग्गज केले, तर आपल्याला तिकीट मिळेल अश्या आशेवर असलेले मग तिकीट मिळवतात. मात्र आता उलटाच प्रकार घडला आहे, राष्ट्रवादीने ज्या उमेदवाराला उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली तोच उमेदवार पक्ष सोडून भाजपात निघाला आहे. केज बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलेल्या अधिकृत पाच उमेदवारांपैकी एक म्हणजे नमिता मुंदडा. मात्र नमिता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, पोस्टमधून नमिता यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले तर आहेच, मात्र यावर राष्ट्रवादीचे चिन्ह किंवा शरद पवारांचा फोटोही कोठेही नाही. त्यामुळे नमिता मुंदडा भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.नमिता लिहितात की, “स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांनी गेली 25 वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च 2012 मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील 7 वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती,” अशी पोस्ट नमिता मुंदडा यांनी केली आहे. आता जर नमिता पक्ष सोडून गेल्या तर राजकीय इतिहास होणार असून प्रथमच अधिकृत उमेदवार हा पक्ष सोडणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती