राष्ट्र्वादीच्या प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद

शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (16:31 IST)
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रणांगणातून बाहेर पडला आहे. चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांना पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे. त्यांच्यासोबतच शंकर पांडुरंग जगता, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके अशा चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याचे कुंभार यांनी सांगितले आहे.
 
विधानसभा निवडणुकासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख संपुष्टात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांसाठी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. यानंतर ५ ऑक्टोबर रोजी सर्व अर्जांची छाननी होणार होती. त्यानुसार ५ ऑक्टोबर म्हणजे  राज्यभरातील उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती