काँग्रेसला बसणार महाधक्का मिलींद देवरा भाजपच्या वाटेवर

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:39 IST)
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपने जोरदार पणे मोडतोड केली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज पक्ष सोडून गेले. सोबत काँग्रेस मधील सुद्धा गेलं. मात्र आता काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसणार असे चित्र आहे, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे भाजपाच्या वाटेवर आहेत असे चित्र निर्माण झाले आहे. कारण आहे मिलिंद देवरा यांनी केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार कौतुक. मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाऊडी मोदी कार्यक्रमाचं चांगलंच कौतुक केलं आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवून दिल्याचाही उल्लेख त्यांनी सोशल मीडियावर  ट्विटमध्ये केलाय. त्यामुळे मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर आहेत की काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात प्रश्न पडला आहे. मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात आजिबात जमत नाही हे सर्वाना ठाऊक आहे. अशात आता मिलिंद देवरा यांनी जर भाजपाची वाट धरली तर काँग्रेसची वाट आणखी बिकट होणार यात काहीही शंका नाही. त्यामुळे काँग्रेसचे मुंबईत मोठे नुकसान होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती